दिल्ली येथे पापन्ना गौड महाराज बलिदान दिन साजरा
करंजी प्रतिनिधी
गौड कलार कलाल समाजाचे दैवत क्रांतिसूर्य सरदार सर्वाई पापन्ना गौड महाराज यांचा शाहिद दिन समारंभ अखिल भारतीय गौड कलार कलाल समाजाच्या वतीने 2 एप्रिल रोजी दिल्ली येथे संम्पन्न झाला त्या कार्यक्रमाला बि.के.हरिप्रसाद हरियाणा काँग्रेस नेते, श्रीपद येसो नाईक केंद्रीय मंत्री गोवा एस.एस.अहलूवालीया खासदार पंजाब सुमन तलवार साऊथ फिल्मी ॲक्टर हैद्राबाद संजय जैस्वाल बि.जे.पी.अध्यक्ष बिहार पूनम प्रभाकर गौड मंत्री तेलंगना तसेच अनेक राज्यातील सामाजिक राजकीय मान्यवर सोबतच महाराष्ट्र गौड कलार कलाल समाजाचे प्रतिनिधी विदर्भ गौड कलार सेवा मंडळ चे अध्यक्ष श्री.नारायण शिल्लेवार , गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री.मलेशम येरोला , भंडारा जिल्हाध्यक्ष श्री.रमेश नलगोपूलवार , सौउंड गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री.परशुराम गोडशलवार., सडक अर्जुनी अध्यक्ष श्री.राजु पदरेवार तसेच देशातील अनेक राज्यातील सामाजिक राजकीय मान्यवरानीं उपस्थिती दाखविली तसेच अनेक समाज बांधवांनी शाहिद दिन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून एक सामाजिक बांधिलकी जोपासून क्रांतिसूर्य सरदार सर्वाई पापन्ना गौड महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याचा प्रसार / प्रचार करणे हे सामाजिक कर्तव्य समजून एक संकल्प सुरु करण्याचे आव्हान सर्व समाज बांधवांना करीत आहे = विशेष उपक्रम क्रांतिसूर्य पापन्ना गौड महाराज यांच्या जीवनपटावर सिनेमा तयार करण्या येणार आहे त्या मध्ये मुख्य भूमिका सादर करणारे साऊथ इंडियन फिल्म अॅक्टर श्री.सुमन तलवार हे निशुल्क सेवा देणार असे जाहीर केले.तसेच येत्या काळात सर्व वर्गीय कलार कलाल समाज पंजाब राज्य तर्फे अहलूवालिया राष्ट्रीय पातळीवर समाज एकत्रिकरण सम्मेलन घेतले जाणार आहे असे जाहीर करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन जय गौड उध्यमम समिती चे अध्यक्ष डॉ.वटीकुट्टी रामाराव गौड व त्यांच्या सहकार्यानी केले