डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनचे लोकार्पण व बुद्ध विहार चे भूमिपूजन खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न
खा.संजय देशमुख 7.50 लाख रुपये निधी देण्याचे आव्हान केले
करंजी प्रतिनिधी
समाज कल्याण विभागा अंतर्गत योजनेतून करंजी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन नविन इमारत उभारण्यात आली त्याचे उद्घाटन व नव्या बुद्ध विहार चे बांधकामा चे भूमिपूजन सोहळा 16 एप्रिल रोजी संपन्न झाला त्या सोहळ्याचे उद्घाटक खासदार संजय देशमुख विशेष निमंत्रित आमदार संजय दरेकर वनी प्रमुख उपस्थिती निमिष मानकर माजी जिल्हा परिषद सभापती सरपंच गणेश रामपुरे संजय निखाडे जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा ,तिरुपती कंदकुंरिवार तालुकाप्रमुख शिवसेना उबाठा, डॉ नरेंद्र खैरे राजूवानखेडे निवृत्त अभियंता निखिल बावणे विजय तेलंगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला
कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत आंबटकर यांच्यातर्फे गौतम बुद्ध मूर्ती दान केली तसेच सुनील वाघमारे यांनी शवपेटी गावाला भेट दिली देणगी सामाजिक दानशूर प्रशांत आंबटकर सुनील वाघमारे यांचे शाल श्रीफळ देऊन खासदार संजय देशमुख आमदार संजय देरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण गायकवाड यांनी केले तर आनंद साठे यांनी डॉ.बाबासाहेबा आंबेडकरांवर विचार व्यक्त केले उद्घाटन प्रसंगी खासदार संजय देशमुख यांनी बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता सात लाख पन्नास हजार रुपये निधीची घोषणा केली तसेच गावातील ज्येष्ठ उपासिका भागथाबाई बेसेकर व ईश्वराबाई उमरे तसेच वर्षाताई वाघमारे कल्पना आंबटकर यांचा खासदार आमदार महोदयाच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाकरिता परिसरातील गावांमधील महिला मंडळ पुरुष मंडळ मोठ्या संख्येत तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तथागत प्रचार आणि प्रसार संस्थेचे अध्यक्ष सुंदर दास कांबळे दिनेश कांबळे सुनील वणकर भूषण देवतळे किशोर भेले प्रफुल वनकर विनोद वनकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद बेसेकार यांनी केले