बुद्ध विहारातून 60 हजार चा मुद्देमाल चोरट्याने केला लंपास
करंजी रोड प्रतिनिधी करंजी गावात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर वस्तीत असलेले बौद्ध समाजाचे बुद्ध विहार मध्ये चोरीचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले यामध्ये बुद्ध विहारात असलेली दानपेटी मध्ये अंदाजे 50 ते 60 हजार रुपये रोख रक्कम व सीसीटीव्हीचे सीडीआर बॉक्स लंपास केला सोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कपड्याने झाकून वायरिंग कट करून चोरी करण्यात चोरट्यांना यश आले.
सदर प्रकरणाची तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे तथागत प्रचार आणि प्रसार संस्थेचे अध्यक्ष यांनी केली
करंजी गावामध्ये वारंवार चोरीचे प्रकार वाढत असल्याने गावातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या पूर्वी दिवसाढवळ्या सुद्धा चोरीचे प्रकार घडलेले असून एकाही चोरी प्रकरणांमध्ये आरोपी पोलिसांना सापडत नाही हे फार मोठे गुपित कधी उघडे होईल असा प्रश्न जनता विचारत आहे घडलेल्या सदर चोरी प्रकरणाचा तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे