Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

महिलांच्या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेकरीता कु चव्हाण व कु कुमरेची निवड

महिलांच्या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेकरीता कु चव्हाण व कु कुमरेची निवड

पांढरकवडा प्रतिनिधी
२५ ते २८ जुलै २०२५ दरम्यान पंजाबच्या चंदीगड येथे संपन्न होत असलेल्या ७२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट स्पर्धेकरीता पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडु कु किरण प्रेमसिंग चव्हाण व कु दिया वसंत कुमरे यांची विदर्भ राज्य महिला संघात निवड करण्यात आली आहे. 
अमरावती येथे आयोजीत ७२ व्या राज्यस्तरीय अजिक्यपद निवड चाचणी स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या कु किरण चव्हाण व कु दिया कुमरे यांची निवड समितीने विदर्भ राज्याच्या महिला संघात निवड केली आहे. विदर्भ महिला व पुरुष संघाचे अमरावती येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर आटोपुन महिला व पुरुषांचा संघ ७२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याकरीता नागपुर वरुन चंदीगडसाठी रवाना होणार आहे. कु चव्हाण व कु कुमरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपुरचे अध्यक्ष माजी खा रामदासजी तडस, उपाध्यक्ष प्रफुल देशमुख, सचिव प्रदिप ठाकुर, मित्र क्रीडा मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, अध्यक्ष मदन जिड्डेवार, सचिव सुनिल कोपुलवार, विश्वस्त गणपत डोंगरे, अशोक कुमरे, प्रकाश दर्शनवार, दुर्गादास कोरन्नेवार, रवि दर्शनवार यांना दिले आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे राम कुमरे, ओमेश दर्शनवार, मनोज राय, राम जिड्डेवार, अजय कुमरे, धिरज रेड्डीवार, आशुतोष जाधव, पंकज भेंडाळे, रितेश मुप्पीडवार, पवन मेश्राम, वर्षा तलमले, दामिनी महाजन, पायल गाउत्रे, भुमि जेंगटे, कल्याणी चिमोटे, समिक्षा मडावी, किर्ती मेश्राम, विद्या आत्राम, अस्मिता मडावी, खुशी मडावी, जान्हवी कन्नलवार, अनुष्का जाधव आदिनी अभिनंदन केले आहे.