राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू
करंजी रोड करंजी येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरे मुक्त संचार करीत असताना झालेला अपघात हा निश्चित स्वरूपाचा होता यापूर्वी सुद्धा सदर विषयाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये. प्रकाशित झाल्या होत्या त्यानंतरही महामार्गावरील गस्त घालत असलेली मोबाईल व्हॅन महामार्ग पोलीस व स्थानिक व ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही त्याचे परिणाम चार जुलै रोजी दुपारी तीन मुख्य जनावराचा राष्ट्रीय महामार्गावर मृत्यू झाला यानंतरही पाळीव जनावरांचे मालकांवर ठोस कारवाही केल्या शिवाय होणारे अपघात थांबणार नाही याचे कारण असे की दररोज 20 ते 25 जनावरे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडून दिवसभर महामार्गावर बसत असतात कधी कधी तर अशी वेळ येतात की वाहन चालकाला वाहन थांबवून जनावरांना रस्त्याच्या बाजूंला करून रस्ता मोकळा करावा लागत आहे भविष्यातही असेच अपघात होत राहील याकरिता कायम स्वरूपी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे झालेल्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे मालक कोण आहे याचा शोध घेणे अवघड झाले असल्यामुळे महामार्ग पोलीस व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांना दफन विधी पार पाडला आहे गावातून जात असलेल्या महामार्गाच्या रस्त्यावरील अनेक घरे बसलेली आहे लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असतात अशा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे
कारण महामार्गावरील कठडे सुद्धा अज्ञात चोरट्या च्या घशात गेले आहे त्यामुळे महामार्गावरील वाहने कोणत्याही दिशेला वळण्याची शक्यता आहे या सर्व प्रकारावर कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे अशी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे