क्रांतिवीर सरदार पापन्ना गौड महाराज व नारायण गुरु यांची 375 वी जयंती महोत्सव देशभरात संम्पन्न
करंजी रोड :
गोलकुंडा किल्ला चे जनक मोगल शाही विरुद्ध लढून साम्राज्य प्रस्थापित करणारे कलाल गौड समाजात जन्म घेतलेले क्रांतिवीर सरदार पापन्ना गौड महाराज यांची 375 वी जयंती महोत्सव देशात अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात येत आहे त्या निमित्य नागपूर येथे गौड विकास परिषद संघटना व
राष्ट्रीय कलाल गौड समाज संघटनेचे पदाधिकारी नवयुवक महिला मंडळ व मोठया प्रमाणात समाज बांधवांच्या उपस्थितीत सरदार पापन्ना गौड यांची 375 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 20 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड या सह देशात अनेक ठिकाणी जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे नांदेड जिल्हा कॉम्रेड पक्षाच्या प्रमुख नेत्या
डॉ. उज्वला पडलवार यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळाल्या बद्दल नागपूर कलाल गौड समाज संघटने तर्फे डॉ. कॉम्रेड उज्वला पडलवार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जयंती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष साऊथ फिल्म अभिनेता जय हिंद पांजाला गौड प्रमुख उपस्थिती चंद्रपाल चौकसे भूषण दडवी हनुमंत गौड महेंद्र डोहारे ऍड.स्वेता जैस्वाल प्रकाश मारकवार सत्यवीर बंडीवार सायक्क पोलीस आयुक्त. शशिकांत समर्थ अध्यक्ष सर्व भाषिय मराठा कलार राष्ट्रीय भारती चौरागडे लक्ष्मी विजयवार लक्ष्मी तालापल्लीवार पत्रकार रमेश लांजेवार दामोदर दियेवार अरुण राजवाडे संजय देवलवार व बाबाराव देवलवार प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय कलाल गौड समाज संघटना सुनील अनंतवार युवा अध्यक्ष राष्ट्रीय कलाल गौड तेलंग समाज संघटना विलास होलगीलवार विदर्भ गौड कलार समाज महासंघ सहसचिव विदर्भ
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्यंकटेश तालपल्लीवार व नरेंद्र धुवारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास होलगीलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश जैस्वाल यांनी केले
--