Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी येथे सर्विस रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघाताची दाट शक्यता

करंजी येथे सर्विस रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघाताची दाट शक्यता       

करंजी रोड : करंजी येथून जात असलेल्या महामार्ग लगत सर्विस रस्ता यवतमाळ वनी ते वनी यवतमाळ करंजी गावांमधून मोठ्या प्रमाणात सर्विस रस्त्याने वाहतूक सुरू असते त्या मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहे पावसाळ्यापूर्वी मागील एक महिना अगोदर नियोजित पद्धतीने डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात आले परंतु आज रोजी अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून जड वाहने अक्षरशा एका बाजूला पूर्णपणे झुकत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे महामार्गावरील पडलेले खड्डे ताबडतोब बुजविण्यात आले परंतु सर्विस रस्त्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने दुचाकी चार चाकी एस टी बस  जडवाहतूक व पायदळ लोकाची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते  अशा परिस्थितीमध्ये अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता करीत आहे तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यास करंजी येथील नवयुकांकडून रस्ता लोक आंदोलन करण्यात चा इशारा देत आहे करिता संबंधित कंपनी व प्रशासकीय विभागाने याची दखल घेण्याची मागणी सर्वत्र जनता करीत आहे