स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान करंजी ग्रामीण रुग्णालयात संपन्न
करंजी रोड राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण आहार यावर विशेष भर म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन चा उपक्रम करंजी ग्रामीण रुग्णालय येथे 29 सप्टेंबर रोजी शेकडो महिला मुली व लहान मुलांची आरोग्य तपासणी करून ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर मंडळीनी योग्य मार्गदर्शन केले या अभियानामध्ये गर्भवती माता व लहान बाळांना पोषण आहारा बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व किशोरवयीन मुलींचे समुपदेशन रक्त तपासणी एक्स-रे इसीजी इत्यादी करण्यात आले स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रमाची आयोजन करंजी ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. संजय तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ तीखे बालरोगतज्ञ डॉ उमेश मडावी मेडिसिन डॉ राजरत्न निथळ दंतचिकित्सक डॉ आनंद कल्याणकर नेत्ररोग तज्ञ डॉ आबा हिवरकर उमरी ख्रिश्चन हॉस्पिटल डॉ सुभाष राठोड सहाय्यक अधीक्षक डॉ सचिन जाधव वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजी या सर्व डॉक्टर मंडळींनी महिला लहान बाळांना व मुलींचे
किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन करंजी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच गणेश रामपुरे सुंदरदास कांबळे हरिभाऊ कुडमते सरपंच कोठोडा निखिल बावणे सचिन मडावी व गावातील शेकडो महिला लहान मुले मुलींच्या उपस्थित स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान पार पडले