Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी येथील सर्विस रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे बुजतील का ?

करंजी येथील सर्विस रस्त्यावरचे  जीवघेणे खड्डे बुजतील का ?             

करंजी रोड प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 नागपूर हैदराबाद चंद्रपूर  यवतमाळ राज्य महामार्ग वर  करंजी गाव हे दोन्ही बाजूने जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर बसलेले आहे या मधून  सर्विस  रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड  वाहतूक बसेस सर्व वाहने अहोरात्र मोठ्या प्रमाणात सुरू असतात अशा परिस्थितीमध्ये मागील दोन  महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सतत पाऊस झाला त्यामुळे सर्विस रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे या मधून वाहने चालविणे अतिश धोक्याचे ठरत आहे  सुरू असलेल्या सर्विस रस्त्यावर कधीही कोठेही गावांमध्ये मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी सुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये सदर विषयावर बातम्या प्रकाशित झाल्या आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही यावरून हे स्पष्ट होते की खड्डेमय रस्त्यावर अपघाताची वाट बघत असल्याचे चित्र दिसत आहे की काय परंतु होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे तरी सर्विस रस्त्या खड्डे मुक्त झालाच पाहिजे अशी मागणी करंजी येथील सर्व व्यापारी व ग्रामस्थ करीत आहे