मुंझाळा तलावा परिसरात वाघाने फस्त केले वासरू करंजी रोड प्रतिनिधी : करंजी पासून दोन किलोमीटर अंतरावर मुंझाळा गावाला लागून असलेले तलावाच्या वरच्या बाजूने शेतकरी किसन रावी यांच्या शेतात गोठ्यामध्ये आठ ते दहा जणांना बांधले होते रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला चढवत एक वासरू मारून काही अंतरावर ओढत नेले व मागचा भाग खाल्लेले अवस्थेत आढळून आला शेतकरी किसन रावी पहाटे साडेपाच वाजता च दरम्यान शेतात गेले असता त्यांना वाघाचे
सुद्धा दर्शन झाले त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत शेतकरी किसनराव यांनी गावातील काही मित्रमंडळींना फोन करून घटनेची माहिती दिली घटनास्थळी गावातील तरुण मंडळी पोहोचले व घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली वृत्त प्रकाशित करे पर्यंत सदर विषयावर माहिती मिळाली चार ते पाच दिवसां मध्ये परिसरात तिसरी घटना आहे जनावर मारण्याची करंजी व परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे वाघाचा बंदोबस्त ताबडतोब करण्यात यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे