वंचित'च्या दणक्याने प्रशासन झाले जागे.
शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ निधी जमा, मात्र तुटपुंज्या मदतीमुळे असंतोष कायम.
सरसकट मदतीच्या मागणीवर सरकारचा दुटप्पीपणा
मारेगांव : अशोक कोरडे
वंचित बहुजन आघाडीने एकाच दिवशी वणी उपविभागीय अधिकारी व मारेगाव तहसील कार्यालयावर केलेल्या जोरदार आंदोलनामुळे आणि दिलेल्या सणसणीत निवेदनामुळे प्रशासनाला अखेर जाग आली. आंदोलनानंतर त्वरित हालचाल झाल्याने काही वेळातचं शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ निधी (आर्थिक मदत) जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आंदोलनात नमूद केल्याप्रमाणे सरसकट आणि भरीव मदत न करता सरकारने तुटपुंजी रक्कम जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तीव्र असंतोष कायम आहे.
निवेदनात गंभीर इशारा :
मा. उपविभागीय अधिकारी, वणी आणि मारेगांव तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बळीराजा शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत शासनाच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी या विषयावर निवेदन देण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु दिवाळी उलटूनही मदत मिळाली नाही. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता.
वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजु निमसटकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात...
१) शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत विना अट तात्काळ खात्यात जमा करावी.
२) शेतमालाच्या दरांवरील नियंत्रण व बाजारभाव कोसळण्यास कारणीभूत घटकांवर कारवाई करावी.
३) फसवी आश्वासने थांबवून कायमस्वरूपी मदतीचे ठोस धोरण जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
प्रशासनाने दिला शब्द :
या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शेतकऱ्यांच्या खात्यात शक्य तितक्या लवकर दुष्काळ निधी जमा करण्याचा शब्द दिला. 'वंचित'च्या जनशक्तीच्या दबावामुळेच प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि निधी वितरण प्रक्रिया त्वरित सुरू झाली, अशी चर्चा सर्वत्र आहे.
सरकारचा दुटप्पीपणा :
निवेदनामुळे निधी मिळण्यास सुरुवात झाली असली तरी, सरकारने मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात कपात करून आपला दुटप्पीपणा पुन्हा सिद्ध केला आहे. 'वंचित'च्या मागणीनुसार सरसकट रक्कम खात्यात जमा न करता केवळ तुटपुंजी रक्कम जमा झाल्याने अडचणीत असलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळल्याचे काम सरकारने केले आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित:
आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनंता खाडे, रवींद्र देविदास तेलंग, ज्ञानेश्वर विश्वनाथ देठे, ज्ञानेश्वर मून, अनिल शंकरराव खैरे, रवी माणिकराव वनकर, प्राणशील पाटील, अमरनाथ तेलतुंबळे, गौतम दारुंडे, गौतम राजेश्वर मालखेडे, डोमाजी हस्ते, राजानंद गांजरे, संजय जीवने, यशवंत भरणे, मुरलीधर जीवने, रमेश ताकसांडे, महेंद्र पाटील, यशवंत पाटील, नंदकुमार कामगाडगे, लक्ष्मीकांत तेलंग, गजानन बोढाले, ज्ञानेश्वर ढवस, संतोष काळे, विनोद उमरकर, रत्नाकर डाखरे, चंद्रशेखर थेरे, रुपेश बाभळे, सौ.शिला दारुंडे, अभिषा निमसटकर, रेखा काटकर, सुमित गेडाम, कविता ताकसांडे, गौतम टाकसांडे, माणिकचंद दारुंडे, राजू पाटील, प्रमोद जीवतोडे यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन देते वेळी राजू निमसटकर यांचे सह मिलिंद पाटील, डॉ.आनंद वेले, डॉ. प्रशिक बरडे, एड. चंदू भगत, तन्मय लांबसोगे, प्रणिता ठमके, मिलिंद नगराळे, कपिल मेश्राम, प्रवीण वनकर, किशोर मुन, विलास तेलतुंबडे, शारदा मेश्राम, अमरनाथ तेलतुंबडे, आशिष पाझारे, मंगल भाऊ तेलंग, अंकित पाझारे यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
'वंचित'चा तीव्र आंदोलनाचा इशारा :
या अन्यायकारक तुटपुंज्या मदतीबद्दल वंचित बहुजन आघाडीने तीव्र असंतोष व्यक्त केला असून, सरकारने लवकरच ठोस व भरीव मदत जाहीर न केल्यास वणी उपविभागात प्रचंड जनशक्तीचे मोठे जन आंदोलन रस्त्यावर उभे राहील, असा गंभीर इशारा पुन्हा देण्यात आला आहे.