विधानसभा निवडणुकीत करंजी येथे मतदान 76 % टक्के झाले
विलास होलगीलवर
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी करिता राळेगाव विधानसभा क्षेत्रात करंजी जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्र नं .20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निरंतर पणे चोक पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान घेण्यात आले मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या 2984 असून त्यापैकी 2255 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यापैकी महिला मतदार 1090 तर पुरुष मतदार 1163 यामध्ये दिव्यांग मतदारांचा समावेश आहे एकूण टक्केवारी 76% शेवटपर्यंत मतदान झाले मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे आपली जबाबदारी पार पाडली मतदान केंद्रावर कुठलीही अपरिचित घटना घडली नाही व शांततेमध्ये मतदान पार पडले