Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

मारेगावात अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष्या निमित्त सहकार दिंडी

मारेगावात अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष्या निमित्त  सहकार दिंडी

सहाय्यक निबंधक कार्यालय आणि श्री.रंगनाथ स्वामी पत संस्था व नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने मारेगाव येथे सहकारी सप्ताहाचे आयोजन

ता प्र मारेगाव
आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 चे स्मरणार्थ, मारेगाव शहरात 1जुलै ते 6 जुलै या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सहभागाने सहकारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले . सहकार अधिकारी सुरेश इंगोले  आणि श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्था  व तालुक्यातील सर्व नागरी सहकारी संस्था  विविध उपक्रमांमध्ये तहसील स्तरावरील सहकारी बँकांचे अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट आणि नागरिक मोठ्या संख्येने या सहकार दिंडी मध्ये  सहभागी झाले होते.
सहकार सप्ताहाच्या माध्यमातून सहकाराचे मूल्य, जनजागृती आणि सामाजिक जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या नियमाणे श्री.रंगनाथ स्वामी पत संस्था यांनी 
सामाजिक जबाबदारी पार पाडताना अनेक उल्लेखनीय उपक्रम घडवले आहेत. यामध्ये सहकारी प्रशिक्षण, स्वच्छता अभियान,  वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर यांचा समावेश आहे.सहकार सप्तहाच्या निमित्याने २ जुलै रोजी सहकारी कायद्याच्या कलम १०१ अंतर्गत ऑनलाइन दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेवर पतसंस्थांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र वणी येथे आयोजित करण्यात आले होते. 2 जुलै रोजी मारेगाव येथे सहकार विभागच्या परिसरात  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये  सहकारी पतसंस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला. ४ जुलै रोजी सकाळी 10 वाजता सहकार कार्यलयाच्या मैदानापासून सहकार दिंडी आणि मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ,कार्यक्रम दरम्यान सहकार अधिकारी सुरेश इंगोले श्रेरीं रंगनाथ स्वामी पत संस्थेचे संचालक उदयबाबू रायपुरे यांनी सहकार संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. 
 यावेळी खरेदी विक्री संघ चे व्यवस्थापक गणेश डाखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोहन खाडे, तसेच पांडुरंग रोगे, श्री.रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष घुग्गुल एकविरा महिला पत संस्थेचे व्यवस्थापक रामकृष्ण झाडे, तसेच तालुक्यातील सर्व सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिव सदस्य तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.