Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीत आजी माजी इतर पक्षाचे उमेदवारांचे करंजी परिसरात मोठया प्रमाणात शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीत आजी माजी इतर पक्षाचे उमेदवारांचे करंजी परिसरात मोठया प्रमाणात शक्तिप्रदर्शन 

 करंजी रोड : महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा नवडणुकीत प्रचाराची रंधुमाळीला  सुरुवात झाली आहे राळेगाव विधानसभा क्षेत्रात एकूण 11 उमेदवार निवडनुक लढत आहे. महायुती भाजप प्रणित डॉ.अशोक उईके तर महाविकास आघाडी काँग्रेस प्रणित प्रा.वसंत पुरके यांच्यात  थेट लढत होण्याचे चित्र असतांना इतर उमेदवार पक्षामधून इच्छुक असतांना तिकीट न मिळाल्या मुळे किरण कुमरे  वंचीत बहुजन आघाडी , अशोक मेश्राम ( मनसे )  अरविंद कुडमेठे ( प्रहार जनशक्ती पार्टी ) तसेच गोंगपा कडून जीवन कोवे, रासप रामदास माहुरे , सन्मान राजकीय पक्षा कडून सुवर्णा अरुण नागोसे अशी उमेदवार रिंगणात आपआपले नशीब अजमावत आहे आजी माजी आमदारांन समोर बंडखोर अधिकृत पक्षाचे आव्हान उभे ठाकल्या चे चित्र दिसत आहे परंतु राळेगाव विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या असल्यामुळे ही निवणूक विकासा च्या मुद्द्यावर उमेदवार लढतांना दिसत आहे सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांनच्या कापुस , सोयाबीन ला भाव नाही शेतमजूराच्या हाताला काम नाही सुशिक्षित बेरोजगारांची बेकारी जटील समस्या आहे यांचे कारण कुठल्याही प्रकाचे औद्योगिक कारखाने नसल्यामुळे बेरोजगारांच्या  उपजीविकेचा प्रशन गंम्भीर होत असल्याचे चित्र दिसत प्रत्येक निवडणुकीत उमेदवार मोठं मोठी आश्वासन देऊन मतदारांना उपेक्षित ठेवत आहे निवणुकीच्या काळात अनेक सुशिक्षित बेरोजगारांचा वापर प्रचारात होतांना दिसत आहे.राळेगाव विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मध्ये सामना होण्याचे चित्र दिसत आहे परंतु इतर पक्षाचे व बंडखोर उमेदवार कोणाच्या पदरात विजयाची माळ घालतील हे तर येणाऱ्या  23 नोव्हेंबर ला स्पष्ट होईल गावागावात चौकाचौकात पानटपरी हॉटेल अशा ठिकाणी चर्चा सुरु असते ती की   कोणत्या उमेदवाराला मतदान केले तर आपल्या भागाचा  विकास होईल अशी चर्चा जोरात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे