Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

किरण चव्हाणची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड

किरण चव्हाणची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड

हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत घेणार भाग

तालुका प्रतिनिधी/१ डिसेंबर

करंजी प्रतिनिधी 
१९ वर्षाआतील मुला-मुलींच्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा सन २०२४-२५ हरियाणातील भिवनी येथील भिम स्टेडियममध्ये ६ ते ११ डिसेंबर पर्यत संपन्न होत आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा मुला- मुलींचा संघ भाग घेणार असुन नुकतेच अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धा व चाचणी मधुन मुला-मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात केळापुर तालुक्यातील उमरी रोड येथील संकल्प कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी तथा पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाची राष्ट्रीय खेळाडु किरण प्रेमसिंग चव्हाण हिची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबिर १ ते ४ डिसेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल स्व वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे आयोजीत करण्यात आले आहे. स्थानिक मित्र क्रीडा मंडळाची खेळाडु किरण चव्हाण हिने याआधी अनेक राज्य व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळलेल्या आहे. तिच्या या निवडीबद्दल यवतमाळ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब मांगुळकर, संस्था अध्यक्ष जितेन्द्रसिंग कोघारेकर, मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मदन जिद्देवार, उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, गणपत डोंगरे, प्रकाश दर्शनवार, अशोक कुमरे, दुर्गादास कोरनेवार, राम कुमरे, अरविंद घावडे आदिंनी कौतुक केले आहे. कु किरण चव्हाण हिला तालुका क्रीडा संयोजक सुनिल कोपुलवार, रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडी बद्दल तिचे अजय कुमरे, आशुतोष जाधव, अनिकेत दुधबडे, रितेश मुप्पीडवार, पंकज भेंडाळे, धिरज रेड्डीवार, पवन मसराम, आकाश बल्लेवार, स्वप्नील चिकराम, क्रीष्णा मेश्राम, चेतन एलकुंचवार, गौरव मडावी, कु वर्षा तलमले, कु पायल गाउत्रे, कु भुमि जेंगटे, कु खुशी ठाकुर, कु किर्ती मेश्राम, कु कल्याणी चिमोटे, कु दिया कुमरे, कु जाधव, कु समिक्षा मडावी, कु विद्या आत्राम, कु जाधव, कु खुशी मडावी, कु चिउ जाधव, कु जान्हवी कन्नमलवार आदि खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.