Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी प्रीमियर लीग सिजन तीन मध्ये बादल मोबाइल संघाने विजेतेपद पटकावले

करंजी प्रीमियर लीग सिजन तीन मध्ये बादल मोबाइल संघाने विजेतेपद पटकावले



अजय नेहारे(बादल मोबाइल) मालिकाविर,नंदू कांबळे(बादल मोबाइल) सर्वोत्तम फलंदाज,बुद्धाराज पुडके( एन एफ सि) सर्वोत्तम गोलंदाज)

करंजी प्रतिनिधी 
करंजी परिसरातील बहुचर्चित करंजी प्रीमियर लीग चा अंतिम सामना पार पडला त्या सामन्यांमध्ये  बादल मोबाइल संघाने एन एफ सि सुपर किंग्ज चा 38 धावाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ,विजेता संघाला 51 हजार रुपये रोख(के पी एल कमिटी तर्फे) व चषक देण्यात आला,अंतिम सामन्यात पराभूत संघ एन एफ सि सुपर किंग ला 25 हजार रुपये रोख( दुर्गेशजी मडावी तर्फे) व चषक देण्यात आला,तृतीय क्रमांक एन बि ब्लास्टर 15 हजार रोख ( धर्मेंद्रजीझोटिंग)व चषक,चतुर्थ क्रमांक के के टी संघ 10 हजार रोख( सुंदरदास कांबळे सर,आचल बूट हाऊस, मनोजजी वानखडे तर्फे)व चषक देण्यात आला, स्पर्धेची सुरवात 8 डिसेंबर ला झाली होती,करंजी परिसरातील 50 गावातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता,एकूण 11 संघ या स्पर्धेत खेळत होते,या स्पर्धेच्या आयोजन व यशस्वीतेसाठी के पि एल आयोजन समिती यांनी अथक मेहनत घेतली,करंजी गावातील गावकरी व व्यापारी मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले,28 डिसेंबर ला स्पर्धेची सांगता झाली.