अखिल भारतीय आंतरविद्यापीठ गोळा फेक स्पर्धेत प्रशांत चव्हाण ची निवड
करंजी रोड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे अथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक तर थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रशांत चव्हाण ने पटकाविला आहे सोबतच 2024 - 2025 अंतर्गत ओडिसा भुवनेश्वर येथे अखील भारतीय आंतरविद्यापीठ मध्ये होणाऱ्या स्पर्धेकरिता प्रशांत सुभाष चव्हाण ची निवड करण्यात आली आहे प्रामुख्याने प्रशांत चे प्रशिक्षक सिंग सर व मुने सर व तसेच महाजन सायन्स कॉलेज यवतमाळ चे संस्थापक सदाशिवराव महाजन गजानन सामृतवार प्रा.आकांशा चौधरी प्रा.सोनल शेरले प्रा.आशिष होरे प्रा.पल्लवी वरखड या सह सर्व शिक्षक वृंद प्रशिक्षक यांना विजयाचे श्रेय देत आहे विशेष बाब अशी की वडील सुभाष चव्हाण हे करंजी रोड येथील एक सामान्य शेतकरी असून दोन्ही मुलांनी क्रीडा क्षेत्रात नाव लौकिक मिळविल्या बद्दल आई वडील व मित्र परिवारा कडून आनंद साजरा करीत आहे तसेच सर्व करंजी ग्रामस्थांन कडून शुभेच्छा चा वर्ष्याव होत आहे