सीसीआय कापुस खरेदी सुरु करा
करंजी परिसरात शेतकऱ्यांनची मागणी
करंजी रोड : महाराष्ट्र राज्या मध्ये यवतमाळ जिल्हा कापुस उत्पादक म्हणून परिचित आहे त्यानुसार केळापूर तालुक्यात मोठया प्रमाणात कापसाचे उत्पन्न हे नेहमीचेच आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा अंतर्गत उपबाजार समिती करंजी येथे सीसीआय कापुस खरेदी केंद्र सुरु करणे अत्यन्त गरजेचे असून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने कापसाला हमीभाव 7521रुपये भाव जाहीर केला असतांना देखील व्यापारी
भाव पाडून कापुस खरेदी करीत आहे परंतु खाजगी व्यापाऱ्यांन कडून 7050 ते 7100 रुपये भावाने खरेदी करीत आहे शेतकऱ्यांनचे एक कि्विंटल मागे 400 ते 500 रुपये नुकसान होत आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव कमी असल्यामुळे शेतकरी कापुस विकण्याचे धाडस करीत नसल्यामुळे बाजार पेठेत सुद्धा फार मोठे मंदी चे सावट दिसत आहे त्यामुळे सीसीआय कापुस खरेदी तातडीने सुरु करावे अशी मागणी करंजी व परिसरातील शेतकरी बांधव मागणी करीत आहे.