करंजी येथे एस.बी आय शाखा सुरु करण्याची मागणी
करंजी रोड : राष्ट्रीय महामार्ग लगता असलेल्या केळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या करंजी बाजार पेठेला 40 ते 50 गाव मुख्य बाजार पेठशी जोडले असून मोठं मोठी आस्थापणा द्वारे दैनंदिन व्यवहार लाखो रुपयाचे होत असते परंतु छोटे मोठे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पांढरकवडा मारेगाव सावरखेडा येथे जावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँक एस बी आय बँक शाखा नसल्यामुळे जवळपास 20 किलोमीटर अंतरावर जाणे अवघड होत असून व्यापारी बांधवांनचे ऑनलाईन कॅश्लेष व्यवहार करणे हे एक मोठे आव्हान ठरत असून मानसिक आर्थिक त्रास सहन करूनही वेळेवर कामे होत नाही करिता एस बी आय शाखा ही अत्यन्त गरजेची झाली आहे असे सर्व व्यापारी व सामान्य नागरिक एस बी आय शाखा तातडीने सुरु करण्याची मागणी सर्वत्र जनता करीत आहे