पस्तीस वर्षांनंतर मैत्रीचे रंग पुन्हा उजळले
जुन्या आठवणींना दिला उजाळा
अशोक कोरडे मारेगाव
काळ कितीही पुढे गेला तरी खरी मैत्री कधीही झाकोळून जात नाही, याचा अनुभव दहावीच्या मित्रांनी घेतला. शाळेच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले आणि नंतर वेगवेगळ्या वाटांनी गेलेले मित्र पस्तीस वर्षांनंतर बत्तीस मित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. गप्पा, हशा, भावना आणि एकमेकांविषयीचे आपुलकीचे क्षण पुन्हा जिवंत झाले. काहीजण डॉक्टर झाले, काही प्राध्यापक, काही नोकरीत तर काही शेती किंवा व्यवसायात व्यस्त असले तरी या स्नेहमेळाव्याने त्यांना पुन्हा एकत्र आणले. शाळेच्या बेंचवर बसून त्या दिवसांची आठवण काढताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
पस्तीस वर्षांपूर्वी शाळेच्या वर्गात एकत्र बसून शिक्षण घेतलेले मित्र पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्या सुवर्णक्षणांचा आनंद साजरा केला. सन 1990 च्या दहावी बॅचच्या या स्नेहमेळाव्याची कल्पना साईनाथ बल्की, मिलिंद चिकाटे आणि विलास पोटे यांना सुचली. त्यांनी सर्वात आधी एकमेकांशी संपर्क साधून कार्यक्रमाची दिशा ठरवली. त्यानंतर योगेश देठे आणि प्रकाश चव्हाण यांनाही कल्पना सांगून मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच वर्गातील सर्व मित्रांपर्यंत माहिती पोहोचली.
या प्रयत्नांमुळे संपूर्ण 1990 बॅचचे १० व्या वर्गातील मित्र एकत्र आले.महात्मा ज्योतिबा फुले शाळा, मारेगाव येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दहावीला शिकवणारे शिक्षक अनुभव पाझारे सर, वाघमारे सर, धोटे सर आणि राजूरकर सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला दारव्हा, घाटंजी, यवतमाळ, नागपूर, भद्रावती आदी ठिकाणांहून मित्र उपस्थित राहिले. शाळेच्या वर्गात प्रवेश करताच सगळ्यांचे मन जणू काळाच्या प्रवासातून मागे गेले. पूर्वी ज्या बेंचवर बसून त्यांनी शिक्षण घेतले होते, त्यावर पुन्हा बसून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काहीजण डॉक्टर, प्राध्यापक, वरिष्ठ व्याख्याते, नोकरी करणारे, शेती करणारे किंवा दुकानदार अशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असूनही एकत्र येण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. शैलेश तेलंग यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान मान्यवरांचे मनमोहक भाषण झाले आणि गाण्याच्या कार्यक्रमात मिलिंद चिकाटे यांनी मित्र वणव्या मधी गारव्या सारखा, हे गीत गाऊन उपस्थित मित्रांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात साईनाथ बल्की यांच्या प्रास्ताविकाने झाली. संचालन संबोधी नरांजे आणि मोरेश्वरी जिवतोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश देठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी सुंदर स्वागत गीत गाऊन वातावरण अधिक स्नेहपूर्ण केले.
संपूर्ण एक दिवस जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला. गप्पा, हशा, भावना आणि प्रेमाने सजलेला हा स्नेहमेळावा उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या तरी मैत्रीचे नाते आजही तितकेच जिव्हाळ्याचे असल्याचे या कार्यक्रमाने दिसून आले.शाळेचे मुख्याध्यापक ताजने सर यांनी कार्यक्रमास मोलाचे सहकार्य केले.
साईनाथ बल्की विलास पोटे मिलिंद चिकाटे योगेश देठे
संजय विरुटकर धनराज नागपुरे प्रकाश चव्हाण
कल्पना पारखी सपना वारारकर धनराज मेश्राम
ज्ञानेश्वर ढवस अनिल वांढरे देवराव बोथले बंडू वनकर
शैलेन्द्र तेलंग राजू भरणे केशव बदखल भूपेश उपलंचिवार
बाबाराव उडाखे दिवाकर गेडाम विष्णु उईके शरद खापणे
गौतम भसारकर गोपीचंद भसारकर ज्ञानेश्वर धोबे
विजय जांभुळकर प्रभाकर किन्हेकर राजू ठक
गणपत अत्राम रावभान शेंडे नंदा कळस्कर
सुनंदा आसुटकर दुर्गा पायघण प्रेमिला नागरकर
मंगला बोथले उषा सुर आदी मान्यवर कायक्रमाला उपस्थित होते.