Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

सभासदांचा विश्वास म्हणजे आमची पुंजी आहे. ॲड. देविदास काळे

सभासदांचा विश्वास म्हणजे आमची पुंजी आहे. ॲड. देविदास काळे

वरोरा येथे श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सभासद मेळावा उत्साहात संपन्न

 उत्कृष्ठ ठेवीदार,उत्कृष्ठ कर्जदार,  उत्कृष्ठ कर्मचारी व उत्कृष्ठ दैनिक ठेव अभिकर्तां  यांच्या केला सत्कार 

संस्थेचे ८७०७५ सभासद असून संस्थेच्या ठेवी ८१८ कोटी ९६ लाख एवढी आहे.

वणी प्रतिनिधी 
ग्राहकांनी आपल्या संस्थेवर आज पर्यंत जो अतूट विस्वास दाखविला तो असाच असू द्या आम्ही तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. सभासदांच्या विश्वासामुळेच संस्था असून सभासदांचा विश्वास म्हणजे आमची पुंजी आहे.सभासदास संस्थेच्या प्रगती बाबत व विश्वासार्हते बाबत संस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी सांगितले , ते म्हणाले की,सभासद हा संस्थेचा मालक आहे परंतु सभासदाने घेतलेले कर्जाची परतफेड नियमित व मुदतीत करण्याचे कर्तव्य सभासदाचे आहे. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय असून संस्थेचे ध्येय धोरणे चालवण्याचे काम संचालक मंडळाचे आहे .  संस्थेचे ८७०७५ सभासद असून संस्थेच्या ठेवी ८१८ कोटी ९६ लाख, संस्थेचे कर्जवाटप ४७७ कोटी व नफा २ कोटी ९७ लाख झाला आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून सद्यस्थितीत संस्थेच्यामुख्यशाखेसह २२ शाखा कार्यरत आहे. संस्थेचे भविष्य उज्वल असून भविष्यातही आम्ही ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊ असे प्रतिपादन ऍड देविदास काळे यांनी अध्यक्षिय भाषांनातून केले.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी र.नं. ११४२ या संस्थेच्या वरोरा (जि. चंद्रपूर ) शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने दिनांक २६/४/२०२५ रोजी वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे सभागृहात सभासद मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड देविदास काळे तर उद्घाटक प्रा. कवडूजी नगराळे , माजी उप प्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला हे होते. 
व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, स्थानिक संचालक परिक्षीत एकरे, संपूर्ण संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे उपस्थित होते . सभासद मेळावा उत्साहात पार पडला. सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री विवेकानंद मांडवकर यांनी प्रास्ताविक सादर केले. 
संचालक श्री परिक्षीत एकरे यांनी मनोगत व्यक्त केले. 
श्री कवडुजी नगराळे, माजी उपप्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला यांनी सभासदास मार्गदर्शन केले. 
या मेळाव्यात संस्थेचे उत्कृष्ठ 
ठेवीदार, उत्कृष्ठ कर्जदार,  उत्कृष्ठ कर्मचारी व उत्कृष्ठ दैनिक ठेव अभिकर्तां आणि संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदाना बद्दल सत्कारमुर्ती चा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ठ ठेवीदार म्हणून सत्कारमूर्ती श्री रुपलाल कावळे 
परवीनबांनो वडसरिया श्रीमती सीमा कन्नमवार 
सौ सविता विधाते श्री लक्ष्मण भीवदरे शाहिद अख्तर शेख 
 श्री सुभाष डफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 
उत्कृष्ठ कर्जदार म्हणून  श्री ठाकूरदास चांडक श्री सचिन पेटकर, शेख शाकीर शेख रसूल यांचा सत्कार करण्यात आला. त्याच पाटोपाठ उत्कृष्ठ दैनिक अभिकर्ता 
 वेणुदास पारखी - प्रथम क्रमांक  शंकर तडस - द्वितीय क्रमांक श्री अनिल पावडे - तृतीय क्रमांक यांचा तर 
उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून  श्री मिलींद गोंडे  सौ .धनंजया ठावरी तसेच संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदाना बद्दल  श्री कालिदास धोटे  श्री आनंद वसाके 
 श्री अशोक चवले  हरेश खडगी, RM सुधन गोल्ड 
या मेळाव्यात संस्थेचे परिसरातील नागरिक व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
मेळाव्याचे संचालन पायल परांडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक श्री सुरेश बरडे यांनी केले.
मेळाव्याचे यशस्विते करिता  संचालक मंडळ,मुख्य कार्यालय, वरोरा शाखा व्यवस्थापक विलास बोबडे, सहकर्मचारी, दैनिक अभिकर्तागण यांनी परिश्रम घेतले.