Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनो, आर्थिक साक्षरतेने घडवा उज्ज्वल भविष्य;

विद्यार्थ्यांनो, आर्थिक साक्षरतेने घडवा उज्ज्वल भविष्य;
प्रा. डॉ. अविनाश घरडे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'वित्तीय साक्षरता' कार्यशाळा संपन्न.

ता प्र मारेगाव:- येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वाणिज्य विभाग’ आणि ‘भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ सप्टेंबर रोजी ‘वित्तीय साक्षरता’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणापुरते न थांबता आर्थिक व्यवस्थापन, नियोजन आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत “कमवा आणि शिका” या संकल्पनेवर भर दिला तसेच आर्थिक निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमात वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. सुकुरवार मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भरतेसाठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले.
   या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथील माजी विभाग प्रमुख डॉ प्रशांत पिसोळकर लाभले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना वित्तीय साक्षरतेबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच भांडवल बाजाराचे महत्व ,शेअर बाजाराची कार्यपद्धती ,म्युचल फंड, एस आय पी ,बचत, गुंतवणूक, उत्पन्न, कर्ज अशा विविध बाबींवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 
त्यांच्या मते आज मनुष्याला जीवन जगण्यासाठी पैसा हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मनुष्याच्या गरजा अमर्यादित आहेत आणि ती भागवणारी साधने मर्यादित असल्यामुळे समाजातील व्यक्तीला कर्ज घ्यावे लागते आणि कर्ज घेतल्यामुळे तो कर्जबाजारी होते. असे चित्र समाजामध्ये आज दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पन्नाचे समाजातील लोकांनी  व्यवस्थितपणे कसे नियोजन करावे बचत कशी करावी, बचतीतून गुंतवणूक कशी करावी आणि गुंतवणुकीतून जास्त उत्पन्न कसे प्राप्त करावे याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पैसा कसा मिळवावा, पैशाने पैसा कसा वाढवावा ,पैशाला योग्य पद्धतीने कामाला कसे लावावे, पैशाची नियोजन योग्य ठिकाणी गुंतवणूक ,बाजारातील चढ-उतार हे प्रत्येक तरुणांसाठी महत्त्वाची बाब लक्षात घेऊन त्यांनी याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आजचा विद्यार्थी उद्याचा गुंतवणूकदार व देशाचा आणि समाजाचा जबाबदार नागरिक ठरणार आहे. त्यामुळे समृद्ध आर्थिक जीवन जगण्याकरता वित्तीय साक्षरता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रवीण कुलकर्णी तर आभार प्रदर्शन संतोष गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.