Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

निवडणुकीचा गजबज आणि भाषेचा चुकीचा वापर

निवडणुकीचा गजबज आणि भाषेचा चुकीचा वापर

नुकत्याच सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांच्या भाषेची पातळी खाली येतेय हे आपणास सर्वानी अनुभवलेच असेल. या निवडणुकीतही हीच गोष्ट दिसून येत आहे. सभ्य भाषेचा वापर न करता एकमेकांवर अब राडा आणि आरोप-प्रत्यारोपांची झोड उठवली जात आहे. यामुळे जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय.
हे सर्व राजकारणाची प्रतिमा खराब करते. निवडणूक ही जनतेशी संवाद साधण्याची आणि राज्याच्या विकासाची दिशा ठरवण्याची संधी असते. पण या गजबजात केवळ स्वार्थी राजकारण आणि नेत्यांचे वैयक्तिक हल्लेच पाहायला मिळतात. जनतेच्या रोजच्या अडचणी आणि त्यावर उपाय याकडे कोणी लक्ष देत नाही आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, अशा भाषेमुळे तरुणांवर वाईट परिणाम होतो. समाजात सन्मान आणि चांगली वागणूक यांच्यासारखे मूल्ये धोक्यात येऊ शकतात.
मतदान म्हणजे चांगल्या नेतृत्वाची निवड करण्याची संधी. म्हणून मतदानाच्या वेळी आपण अशा नेत्यांची निवड करायची आहे ज्यांच्या बोलण्यात विचारपूर्वकता आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल. तसेच ज्यांना जनतेच्या समस्यांची जाण असून त्यावर उपाय सुचवतील.
आपल्या मताचा सकारात्मक परिणाम व्हायला हवा. म्हणून अशा नेत्यांची निवड करू ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक समर्थ आणि चांगले होईल.