Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

शहरातील दुकान व आस्थापनेवरील पाट्या मराठीत करा, मनसेची मागणी

शहरातील दुकान व आस्थापनेवरील पाट्या मराठीत करा, मनसेची मागणी 


वणी / प्रतिनिधी 
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आग्रही असून होती. या भाषेचा मान सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे याच अनुषंगाने शहरातील सर्व दुकाने व आस्थापनांवरील नामफलक (पाट्या) मराठी भाषेत असाव्यात, अशी मागणी आज  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
भाषिक प्रांतावर रचनें नंतर प्रादेशिक भाषेला योग्य मान सन्मान मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ७ सप्टेंबर १९८१ रोजी  महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल व आहारगृहा वरील नामफलक मराठीत असावे अशी सक्तीचे केले. मात्र एवढे वर्ष उलटूनही हा शासन निर्णय अंमलात आला नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यातील सर्व नाम फलके मराठीत व्हावे यासाठी ठिकठिकाणी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात  या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले, ज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत शासनाचे नियम व मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे आणि तिचा वापर सर्वत्र होणे आवश्यक आहे. शहरातील व्यापारी आणि दुकानदारांनी स्वतःहून आपल्या पाट्या मराठीत कराव्यात, असे आवाहनही मनसेने केले आहे.
या मागणीवर नगर परिषद प्रशासनाने येत्या ८ दिवसात योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, मा. महिला सेना जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, विलन बोदाडकर, दिलीप मस्के, वैशाली तायडे, मेघा तांबेकर, विलास चोखारे, जितेंद्र शिरभाते, अहमद रंगरेज, जुबेर खान, मनोज नवघरे, योगेश माथनकर, कृष्णा कुकडेजा यांच्या सह शहरातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...