Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

मोक्षधाम करंजी येथे जागतिक योग दिननिमित्त वृक्षारोपण

मोक्षधाम करंजी येथे जागतिक योग दिननिमित्त वृक्षारोपण

विलास होलगीलवर: जागतिक योग दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, योगाचे महत्व प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मोक्षधाम सौन्दर्य करण ग्रुपने योग दिन साजरा केला आणि वृक्षारोपण कार्यक्रमात गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन श्रमदान केले. योग दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी विलास होलगीलवार, दीपक खुराना, योगेश उपाध्ये, अनिल सिडाम, शुभम पदीले, संदीप मडावी, सुभाष चव्हाण, नारायण वासेकर, बंडू धंदरे, राजेंद्र पाटील, सागर मुडे, नंदकिशोर वासेकर, कुणाल दर्वे, हेमंत दोरेवार, रत्नना वाडीकर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत योग दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि गावातील हवामान सुधारण्यास हातभार लागेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी मोक्षधाम सौन्दर्य करण ग्रुप आणि गावातील तरुणांचे अभिनंदन करण्यात आले.