Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी येथे कार्तिकी दिंडीला सुरुवात गावात झाले भक्तिमय वातावरण

करंजी येथे कार्तिकी दिंडीला सुरुवात      
गावात झाले भक्तिमय वातावरण 

करंजी रोड : दिवाळी नंतर ग्रामीण भागात कार्तिक दिंडीला सुरुवात केली जाते त्या अनुषंगाने   करंजी गावात मागील अनेक वर्षा पासून सांप्रदायक शेखडो तरुण जेष्ठ मंडळी व बाल गोपाल   भक्तगन एकत्र येऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी   शनिवार पासून काकड आरतीला सकाळी पाच वाजता हनुमान मंदिरा पासून सुरुवात केली  गावातील प्रत्येक मार्गाने भजन पूजन भक्तिमय गाणे टाळवृदंगाने गावात भक्तिमय वातावरण दिसते.कार्तिक दिंडीच्या स्वागता करिता रस्त्या रस्त्यावर, घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करून दिंडीचे स्वागत केल्या जाते. त्या सोबतच चाहा पाणी नास्ता ची सुद्धा व्यवस्था केली जाते. कार्यक्रमाचे नित्य नियम पाळून सर्व भक्तगन दररोज सकाळी वेळेत दिंडीला  सुरुवात करतात त्यामुळे   गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.दिंडी मध्ये सहभागी पांडुरंग क्षीरसागर  अरुण बावणे दीपक खुराना योगेश उपाध्ये  गणेश चव्हाण रामराव राठोड अनील सिडाम प्रदीप राऊत चंदू राठोड शंकर चव्हाण संचित टिपले अनेक महिलांभगिनी व बालगोपाल एकत्र येऊन मोठया उत्साहाने कार्तिकी दिंडी मध्ये  सहभागी होत आहे.