Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

तालुक्यातील पिसगांव कुंभा येथे भूकंपाचे सौम्य धक्के

तालुक्यातील पिसगांव कुंभा येथे भूकंपाचे सौम्य धक्के 

कुठेही हानी नाही ;तहसीलदार यांनी पिसगांव कुंभा या ठिकाणी केली नागरिकांशी चर्चा 

अशोक कोरडे 
मारेगाव तालुक्यातील पिसगाव आणि कुंभा या गावात शक्रवार ला (ता. 15) रात्री 10:10 वा. भूकंपाचा धक्का जाणवला, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. त्यामुळे या भागात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. भीतीपोटी काही नागरिक घराबाहेर येऊन थांबल्याचा अनुभवही प्रत्यक्षदर्शींनी सांगितला. पिसगाव येथील नागरिकांनी तर कुंभा येथील तलाठी सुरावार यांनी तहसीलदार यांना सकाळी फोन द्वारे माहिती दिली. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी तात्काळ पिसगांव आणि कुंभा या ठिकाणी भेटी घेऊन नागरिकांशी चर्चा केली.
तालुक्यातील काही भागांमध्ये काल रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.त्यामुळे अनेकात भितीचे सावट पसरले आहे.
सोशल मीडिया आणि नागरिकांमध्येच संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. . तालुका प्रशासन यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याची माहिती आहे.

तालुक्यांतील कुंभा, पिसगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे असल्यामुळे काहींना हलल्या सारखे झाले.रात्री आपल्या घरी झोपण्याचा तयारीत असलेले नागरिक भुकपाच्या धक्क्याने घरा बाहेर पडले.सम्पूर्ण घर हलल्या मुळे नागरिकांना मध्ये भीती निर्माण झाली आहे.

मौजा पिसगांव, कुंभा गावात भेट देऊन सरपंच आणि नागरीकांशी समक्ष चर्च्या केली असता त्यांनी रात्री 10-10 वाजता भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे मात्र कोणतेही नुकसान झाले नाही असे सांगितले. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे.
उत्तम नीलावाड तहसीलदार मारेगाव

रात्री दहा सव्वा दहा च्या दरम्यान लाइट गेली होती आम्ही सगले घरीच होतो.अचानक बेड हलला खिड़किचे काच वाजले.काही समजलेच नाही सगळे अचानक घड़ल.गावातील लोक घरच्या बाहेर निघले आणि चर्चा सुरु झाली.तेव्हा समजले की ते भूकंपाचे धक्के होते सम्पूर्ण लोकांमध्ये भीती चे वातावरण आहे.
भूषण कोल्हे पिसगांव