छ शिवाजी महाराज जयंती निमित्य शिव मॅराथान
विविध स्पर्धेसह तुषार सुर्यवंशी यांचे सप्तखंजेरी किर्तन
मराठा सेवा संघाचे आयोजन
ज्योतिबा पोटे मारेगांव
रयतेचे कल्याणकारी राजे छ शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मारेगांवात मोठ्या उत्साहात विविध स्पर्धा , शिवमॅराथान , नागपूर येथील प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक तुषार सुर्यवंशी यांच्या क्रांती वाणीतून शिवप्रेमीना वैचारीक मेजवानी मिळणार आहे, १९ फेब्रुवारीला मारेगांव येथे नगरपंचायत प्रांगणात होत असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात येत आहे संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान छ शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड व कला वाणिज्य विज्ञानमहाविद्यालयाच्या सहकार्याने संपन्न होणार आहे, सकाळी ६ वाजता शिवस्तवन गिताने जयंती कार्यक्रमाला सुरवात होत असून सकाळी ७ वाजता शिवमॅराथान स्पर्धा महिला व पुरुष खुल्यागटासाठी होणार आहे, यामध्ये पुरुष गटासाठी ७ किमी अतंर असून महिला गटासाठी ५ किमी अंतर पार करावे लागणार आहे, या मॅरॉथान प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आले नाही, या मध्ये पुरुष गटाला प्रथम बक्षिस पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये तृतिय दोन हजार रुपये असून महिला गटासाठी प्रथम बक्षिस तीन हजार रुपये , द्वितीय दोन हजार रुपये व तृतिय बक्षिस एक हजार रुपये ठेवण्यात आले, शिव मॅराथान स्पर्धा झाल्यानंतर छ शिवाजी महाराज यांना अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ . ३० वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश गवळी , अध्यक्ष मराठा सेवा संघ मारेगांव तर प्रमुख अतिथी उत्तम निलावाड तहसिलदार मारेगांव, संजय सोळंखे , पोलीस निरिक्षक मारेगांव , भिमराव व्हनखंडे , गटविकास अधिकारी पं स मारेगांव , शशिकांत बाबर , मुख्याधिकारी नगरपंचायत मारेगांव हे उपस्थित रहाणार आहे, यानंतर सकाळी ११ वाजता स्लो सायकल स्पर्धा, दुपारी १२ वाजता चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा दुपारी २ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे, सायं पाच वाजता ५ वाजता शिवकालीन देखाव्यासह मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे , सायं ७ वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक तुषार सुर्यवंशी यांचा छ शिवाजी महाराज यांच्या जीवनावर किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, छ शिवाजी महाराज यांच्यां जयंती उत्सव कार्यक्रमात सर्व शहरवासिय व परिसरातील शिवप्रेमीनी सहभागी होऊन रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्याचे आवाहन मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगांवच्या वतीने करण्यात येत आहे .