Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

मारेगाव शहरातून 80 महिला अयोध्या तीर्थक्षेत्रासाठी रवाना

मारेगाव शहरातून 80 महिला अयोध्या तीर्थक्षेत्रासाठी रवाना

मारेगाव शिवसेना  तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांचा पुढाकार 

लाडक्या बहिणींना अकरा तीर्थस्थानाचे मिळणार दर्शन

ता प्र मारेगाव 

मारेगाव येथील लाडक्या बहिणी महाराष्ट्र तसेच उत्तर भारत येथील तीर्थस्थळ पाहणीला निघालेल्या आहे. या सर्व महिलांची व्यवस्था शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केली असून हा तीर्थक्षेत्र दौरा 10 दिवस राहणार आहे.नुकतेच त्यांनी अयोध्या येथे दर्शन करून पुढील तीर्थाला निघाले आहे.
मारेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी शिवसेना नेता विशाल किन्हेकर नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. या आधीही अयोध्या दौरा करण्यात आलेला होता. यावेळी 80 महिलांसाठी ही तीर्थस्थळ सहल आयोजित करण्यात आलेली आहे. 10 दिवस असणाऱ्या या सहलीमध्ये मयर, चित्रकूट, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, आग्रा, मथुरा, झाशी, खांडवा, शेगाव असे तीर्थस्थळ दाखवण्यात येणार आहे. या सर्व महिला खासगी बसने मारेगाव येथून रवाना झाल्या असून 10 दिवस हा त्यांचा तीर्थस्थळ दौरा आटोपून परत मारेगाव येणार आहे.