Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्या मनसेची तहसीलदारांकडे मागणी.

बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्या मनसेची तहसीलदारांकडे मागणी.

घरकुल लाभार्थ्यांना रखडलेल्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने मोफत रेतीची केली मागणी 

वणी/ प्रतिनिधी: 
जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी तसेच इतर बांधकामे रेती अभावी रखडले असल्याकारणाने त्यांना सुद्धा रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी वणी येथील तहसीलदारांना केली आहे. 
वणी शहरासह तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे १५००० हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. 
घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, वणी तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेवून रेती तस्कर ज्यादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत, वाढत्या महागाई मुळे  घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचे होईल.  यासह शहरातील अनेक नागरिकांनी आपलं स्वतःचा हक्काचं घर असाव यासाठी घराची बांधकाम चालू केले मात्र रेती अभावी ही कामे सुद्धा पूर्णता रखडलेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, दिलीप मस्के, वैशाली तायडे, मेघा तांबेकर, संकेत पारखी, जुबेर खान, विनेंद्र गर्डे, विजय चोखारे, कृष्णा कुकडेजा यांच्यासह शहरातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..