पहलगाम हल्ल्याचा मारेगांवात निषेध
शिवसेना युवासेना शिंदे गटाकडून मार्डी चौकात निदर्शने
ता प्र मारेगांव
जम्मु काश्मिर मधील पहलगाम येथे पर्यटकावर केलेल्या हल्ल्याचा मारेगांव येथे शिवसेना (शिंदे गट ) ने निषेध व्यक्त करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहिली.
काश्मिर खोऱ्यातील पहलगाम येथील वैसरन येथे दोन दहशतवादी लश्करी गणवेशात तेथील पर्यटकावर अंधधुंद गोळीवार करीत 26 पर्यटकाचा मृत्यु झाला तर 15 च्या वर जखमी झाले. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मारेगांव तालुका शिवसेना (शिंदे गट )चे तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांच्या नैतृत्वात मारेगांव मार्डी चौकात असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध व्यक्त करित मृतकांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली यावेळी शिव सेने चे विजय मेश्राम ,धनराज भट , उमेशउलमाले ,,धर्मा जाधव राजू खडसे ,राजेंद्र ठक,भीमराव मेश्राम , प्रवीण गमे , मनोहर मोहुर्ले ,महादेव लोणारे गणपत वाढई ,किशोरभाऊ शेंडे , महेश धूमने ,संतोष नागोसे, संदीप शिरामे , नितीन कापसे,प्रशांत भंडारे , अमोल मत्ते,शंकर ,तेजस कापसे ,बाळू चावके ,कार्तिक नेहारे , वेदांत , तन्मय सरोदे , गोलू कापसे,अक्षय कोयचाडे ,मनोज नेहारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .