Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालय, मारेगाव येथे अत्यल्प मासिक शुल्कात मिळवा प्रशस्त अभ्यासिकेत प्रवेश

सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालय, मारेगाव येथे अत्यल्प मासिक शुल्कात मिळवा प्रशस्त अभ्यासिकेत प्रवेश

अशोक कोरडे 

"शिका, संघटित व्हा,आणि संघर्ष करा", या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्तीनुसार शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे. मात्र बऱ्याचदा परिस्थितीमुळे गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शहरातील विद्यार्थ्यांसारख्या सोयी सुविधा गावपातळीवर मिळत नाहीत. विद्यार्थ्यांची नेमकी हीच गरज ओळखून सर्वसामान्य, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अभ्यासिकेचा लाभ आपल्याच शहरात घेता यावा याकरिता मा. नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, नगरसेवक जित नगराळे (प्रभाग क्र. 17) व इतर सर्व नगरसेवक यांच्या यशस्वी प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालय, मारेगाव शहरात निर्माण झाले आहे. नगरपंचायतीची नव्याने निर्माण झालेली ही सुसज्ज अभ्यासिका अवघ्या काही दिवसातच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे. अभ्यासिकेत मर्यादित जागा (60) असल्याने अभ्यासिकेत प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षेचे नियोजन नगरपंचायत द्वारे करण्यात आलेले आहे. सदर परीक्षा 25 मे रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे होणार आहे. परीक्षेकरिता प्रवेश अर्ज 13 मे ते 22 मे या कालावधीत नगरपंचायतीच्या आस्थापना विभागात उपलब्ध असतील. परीक्षा 100 गुणांची व 100 प्रश्नांची असेल. परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. परीक्षेत प्रश्नांची विभागणी - 25 प्रश्न मराठी भाषा, 25 प्रश्न इंग्रजी भाषा, 25 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 25 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता याप्रकारे असेल. परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर केला जाईल. अभ्यासिकेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे सर्व संदर्भ साहित्य अभ्यासिकेत वाचनासाठी मोफत उपलब्ध असणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मारेगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. परीक्षेबद्दल अधिक माहितीसाठी नगरपंचायत कार्यालयातील आस्थापना प्रमुख कविता किनाके (मो. क्र. 7276362737) यांच्याशी संपर्क साधावा. 

" अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा याच महिन्याच्या शेवटी नियोजित आहे, तत्पूर्वी अभ्यासिकेच्या प्रवेश परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून तालुक्यातील 60 प्रज्ञावान विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना अभ्यासिकेत नाममात्र मासिक शुल्क आकारून प्रवेश निश्चित केला जाणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे व या संधीचा लाभ घ्यावा असे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो."

शशिकांत मा. बाबर (मशप्रसे)
मुख्याधिकारी (गट-अ)
नगरपंचायत, मारेगाव