दुचाकी अपघातात पिसगावचे मोहन पाचभाई ठार
ता प्र मारेगाव
मारेगाव येथील प्रसिद्ध विधिज्ञ अँड. परवेज पठाण यांचे कास्तकार कृषी केंद्रात कार्यरत पिसगाव येथील श्री. मोहन जयराम पाचभाई (55) यांचे दि.31 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजताचे दरम्यान अपघाती निधन झाले.मोहनभाऊ यांच्या अकाली मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहन हे शनिवार ला नेहमी प्रमाणे नियमित कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास स्वगावी पिसगाव येथे दुचाकीने जात होते. दरम्यान विरुद्धदिशेने येणाऱ्या वाहणाने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात मोहन पाचभाई हे खाली कोसळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर वणी येथे हलवितांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून शामराव मालेकर यांचेवर कलम 106 (1),281, नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मोहन पाचभाई यांच्या अकाली निधनाने पिसगाव – मारेगाव येथे शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहे.