Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

ध्येय समोर ठेवले की यश निश्चित मिळते ;अरविंद ठाकरे

ध्येय समोर ठेवले की यश निश्चित मिळते ;अरविंद ठाकरे 

श्री. रंगनाथ स्वामी ना. सह. पतसंस्थे द्वारे इयत्ता10 व 12 वीच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा मारेगाव येथे सत्कार 

ता प्र मारेगाव 
सातत्य आणि जिद्दीने कष्ट केले तर यश नक्की मिळते. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास करावा, असे विचार श्री. रंगनाथ स्वामी ना. सह. पतसंस्थेचे संचालक श्री. अरविंद ठाकरे यांनी व्यक्त केले.
मारेगाव तालुक्यातील इयत्ता 10 व 12 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मारेगाव येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था शाखा मारेगाव च्या सभागृहात  आयोजित करण्यात आला होता.सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री उदय भाऊ रायपुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरविंद भाऊ ठाकरे तसेच शाखा व्यवस्थापक श्री संतोषभाऊ घुगुल उपस्थित होते.अरविंद ठाकरे म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात गेला तरी कष्टाला शॉर्टकट नाही.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कष्ट करावेच लागणार आहे. करिअरचा मार्ग निवडताना ज्या क्षेत्राची आवड आहे, तेच निवडा.असा त्यांनी मोलाचा सल्ला दिला तर उदय रायपुरे म्हणाले की. विध्यार्त्यांनी  कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी तणावात राहू नये. चांगल्या सवयी, सतत वाचन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निश्चित ध्येय ठेवा, कठोर परिश्रम करा, स्वतःशी प्रामाणिक राहा.  तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे ते म्हणाले.यावेळी नक्षत्र पाटणकर,सानिका निमसटकर, अनुष्का पाटील, तन्वी मोघे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीते करता मिलिंद चिकाटे,अमोल ढवस,आनंद गंगशेट्टीवार, आयुष ढवस,शंकर चिंचोलकर,  अनिल भगत तसेच दैनिक अभिकर्ता यांनी परिश्रम घेतले.